रॉबर्ट वाड्रा रुग्णालयात दाखल


कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि उत्तर प्रदेश कॉंग्रेस प्रमुख प्रियांका गांधी यांचे पती, उद्योजक रॉबर्ट वाड्रा याना सोमवारी पाठदुखी आणि पायात वेदना सुरु झाल्याने सेक्टर ११ मधील मेट्रो रुग्णालयात दाखल केले गेले असून अस्थिरोग तज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. रॉबर्ट वाड्रा नियमित तपासणीसाठी हॉस्पिटल मध्ये गेले होते असे सुरवातीला सांगितले गेले होते मात्र त्यांना पाठीत वेदना होत होत्या आणि त्यामुळे काही तपासण्या करण्यासाठी ते रुग्णालयात गेले तेव्हा या तपासण्या झाल्यावर त्यांना हॉस्पिटल मध्ये अॅडमिट करून घेतले असे समजते.

रॉबर्ट वाड्रा रुग्णालयात दाखल झाल्याचे समजताच प्रियांका गांधी सायंकाळी हॉस्पिटलमध्ये आल्या व रात्रभर तेथेच थांबल्या होत्या. सोनिया गांधी यांनीही रॉबर्ट वाड्रा यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. प्रियांका आणि सोनिया हॉस्पिटल मध्ये कमांडो सुरक्षा व्यवस्थेत आल्या तेव्हा बाकी रुग्ण आणि त्यांना भेटायला येणारे नातेवाईक यांची वर्दळ बंद केली गेली होती असे समजते. मिडियाला हॉस्पिटल मध्ये प्रवेश दिला गेला नाही. रॉबर्ट वाड्रा यांचा सिटी स्कॅन केला गेला. त्यांना संधीवाताचा त्रास असल्याचे सांगितले जात आहे. आज मंगळवारी राहुल गांधी रॉबर्ट वाड्रा यांच्या भेटीला येतील असे समजते.

Leave a Comment