हा पोलिसवाला चक्क दलेर मेहंदी गाणे गात करत आहे वाहतुक नियमांबाबत जनजागृती


चंदीगड: एका पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो दलेर मेहंदीच्या ‘ता रा रा रा’ गाणे गाऊन लोकांना वाहतुकीचे नियम समजावून सांगत आहे. हा व्हिडिओ स्वत: दलेर मेहंदी यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. चंदीगडच्या पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ शेअर झाल्यामुळे त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

42 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये दलेर मेहंदीच्या 1995 हिट नंबर बोलो ता रा रा सारखी मिळती जुळती धुन बनवुन ‘नो पार्किंग सॉंग’ गाताना दिसत आहे. पोलिसांनी या गाण्याचे बोल बदलले आहेत. कारण हे गाणे पार्किंगबाबत बनवले गेले आहे.


‘ठीक आहे, पार्किंगमध्ये जा’ असे म्हणत पोलिस कर्मचारी मायक्रोफोनवर त्याचे ‘नो पार्किंग सॉंग’ गात आहे. दलेर मेहंदी यांनी व्हिडीओ पोस्ट करत खूप छान. ट्रॅफिक पोलिसांनी नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करण्यासाठी त्यांच्या गाण्याचा वापर केल्याचा त्यांना आनंद झाला असल्याचे आपल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी लिहिले आहे कि आनंद म्हणजे दलेर मेहंदी. सेलिब्रेशन म्हणजे दलेर मेहंदी. आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद.

व्हिडिओ इंटरनेटवर सतत व्हायरल होत असून तीन दिवसांत सुमारे 16,000 वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे आणि त्याला खुप लाईक्स मिळाले आहेत. पोलिसांच्या तसेच गायक दलेर मेहंदी यांच्या पोस्टचे नेटिझन्सनी कौतुक केले आहे.

Leave a Comment