भाजप आमदारचे धक्कादायक वक्तव्य, कोणतेही बटण दाबा मत भाजपलाच जाणार


नवी दिल्ली – ईव्हीएमसंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचा व्हिडिओ हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. भाजपचे आमदार बक्शीस सिंग विर्क यांनी ईव्हीएममध्ये कोणतेही बटण दाबले तरी मतदान भाजपलाच जाईल, असे व्हिडिओमध्ये म्हटल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांचा मुलगा दीपेंद्रसिंग हुड्डा यांनी शेअर केला आहे.


कुणालाही तुम्ही मतदान करा, पण ते भाजपलाच जाईल. कुणाला तुम्ही मतदान केले आहे. तेही आम्हाला माहिती होईल. आमच्या बाबतीत तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मोदींची आणि मनोहर लाल यांची नजर खुप तीक्ष्ण आहे. मशिनमधील कोणतेही बटन तुम्ही दाबले तरी ते मत भाजपलाच जाईल, अशी व्यवस्था आम्ही करुन ठेवली असल्याचे बक्शीस सिंग विर्क म्हणत व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

आज हरियाणा विधानसभेसाठी मतदान होत असून सत्ताधारी भाजपचा विरोधी काँग्रेस आणि नव्याने स्थापन झालेल्या जजपाशी संघर्ष आहे. राज्यात पक्षाच्या नेतृत्वात बदल झाल्यानंतर काँग्रेसने पुनरागमन करावे अशी अपेक्षा असताना या निवडणुकीत भाजपने ७५ हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे १ हजार १६९ उमेदवार रिंगणात आहेत. सध्या ९० सदस्यी विधानसभेमध्ये भाजपचे ४८ सदस्य आहेत. हरियाणामध्ये २०१४ ला भाजपने प्रथमच स्वबळावर सत्ता गाजवली होती.

Leave a Comment