कुत्र्यांबरोबर झोपण्यासाठी यांनी बनविला 13 फुटी बेड

तुम्ही तुमच्या घरात पाळलेल्या प्राण्यावर किती प्रेम करता ? तुमचे उत्तर नक्कीच हे असेल की, एवढे की सांगू शकत नाही. मात्र अमेरिकेतील अलाबामा येथे राहणाऱ्या या कपल्सपेक्षा नक्कीच कमी असेल. अल्बामा येथील कपलने आपल्या पाळीव कुत्र्यांबरोबर झोपण्यासाठी चक्क 12 फुटांचे बेड तयार केले आहे. जेणेकरून ते आपल्या पाळीव कुत्र्यांबरोबर अधिक वेळ घालवू शकतील.

49 वर्षीय जेनिफर टेलर आणि त्यांचा पती 60 वर्षीय स्टिव्ह या दोघांनी घरात दोन किंग साइज्ड गाद्यांचा वापर करून 13 फूटांचा बेड बनवला आहे. त्यांच्याकडे डॅकहुंड प्रजातीची पाच – लिंडन, रॉबिन, सोफिया, जुनो आणि जुलिया व दोन फ्रेंच बुल डॉग- ब्रुकलिन आणि हेमिंगवे अशी सात कुत्रे आहेत.

जेनिफरने सांगितले की, माझे संपुर्ण घर एकप्रकारे कुत्र्यांच्या राहण्याचे ठिकाण झाले आहे. एकाच वेळी ही सर्व कुत्री बेडवर आमच्याबरोबर आम्हाला हवी होती. त्यामुळे स्टिव्ह आणि मी 13 फूटांचा बेड बनवण्याचा विचार केला. जेणेकरून कुत्री त्याच्यावर झोपू शकतील. कुत्र्यांना हे स्वतःचे घर वाटावे यासाठी आम्ही हा बेड बनवला.

Leave a Comment