ट्रेंडः साताऱ्यात जाणत्या राजाला पावसाचा अभिषेक


सातारा – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी साताऱ्याच्या सभेत एखाद्या माणसाकडून चूक झाली तर ती चूक कबुल करायची असते. माझ्याकडून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चूक झाली मी जाहीरपणाने हे कबूल करतो. पण मला आनंद आहे, की साताऱ्याचा प्रत्येक माणूस ती चूक सुधारण्यासाठी २१ तारखेची वाट बघत असल्याचे सांगत लोकसभेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे त्यांनी भरपावसात आवाहन केले.


शरद पवारांनी प्रचंड पाऊस सुरू झाल्यानंतर भाषण थांबवण्याऐवजी मतदारांना संबोधित करणे थांबवले नाही. त्यांनी भर पावसात केलेले भाषण तरुणाईमध्ये आकर्षण निर्माण करणारे ठरले आहे. यावर शरद पवारांचा अनेकांनी ८० व्या वर्षी असलेल्या उत्साहाला सलाम केला आहे.

Leave a Comment