प्रियंका मिळवून देणार ‘गल्ली बॉय’ला ऑस्कर? - Majha Paper

प्रियंका मिळवून देणार ‘गल्ली बॉय’ला ऑस्कर?


सध्या रणवीर सिंहच्या ‘गल्ली बॉय’ या चित्रपटाची हिंदी सिनेसृष्टीत जोरदार चर्चा होता आहे. कारण हा चित्रपट भारताकडून ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी पाठवण्यात आला आहे. चित्रपट क्षेत्रातील आजवरच्या सर्वात मोठ्या पुरस्कारांपैकी एक म्हणून ऑस्कर हा ओळखला जातो. या पुरस्कारावर नाव कोरणे काही सोपी गोष्ट नाही. कारण या स्पर्धेत जगभरातील सर्वोत्तम असे शेकडो चित्रपट भाग घेतात. बॉलिवूडचा आजवरचा इतिहास पाहता आपली पाटी अद्याप ऑस्करच्या बाबतीत कोरीच आहे. पण ‘गल्ली बॉय’चे नाव यावेळी या कोऱ्या पाटीवर लिहिता यावे यासाठी देसी गर्ल प्रियंका चोप्रा स्वत: मैदानात उतरली आहे.

प्रियंकाने ‘गल्ली बॉय’ला ऑस्कर पुरस्कार मिळावा, यासाठी चित्रपटाचा जोरदार प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या डिसेंबर महिन्यात या पुरस्काराचे नामांकन घोषित केले जाणार आहे. ‘गल्ली बॉय’ला या नामांकन यादीत स्थान मिळावे यासाठी प्रियंका स्वत: प्रयत्न करत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ही नवी घोषणा प्रियंकाने केली आहे. यासाठी तिच्याकडे एक विशेष योजना आहे. या नव्या योजनेची माहिती येत्या काळात सर्वांना मिळेल. दरम्यान ही योजना यशस्वी होण्यासाठी इतर बॉलिवूड कलाकारांनी देखील सहकार्य करावे अशी विनंती तिने केली आहे.

Leave a Comment