डॉमिनोजचा भारतातून काढता पाय ?


मुंबई: जागतिक आर्थिक मंदीचा मोठा फटका देशभरात मोठ्याप्रमाणावर पिझ्झा आऊटलेटस असलेल्या डॉमिनोझ कंपनीला बसला असून कंपनीने अनेक देशांतून आतापर्यंत आपला गाशा गुंडाळला आहे. डॉमिनोझ पिझ्झा परिस्थिती आणखी बिकट झाल्यास भारतामधूनही काढता पाय घेण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिझ्झा हा खाद्यप्रकार भारतामध्ये रुजवण्यात आणि सामान्यांना परवडेल, अशा किंमतीत तो उपलब्ध करून देण्यात डॉमिनोझचा मोठा वाटा असल्यामुळे या बातमीने भारतातील खवय्यांची चिंता वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जागतिक मंदीमुळे ब्रिटनस्थित डॉमिनोझला आर्थिक पातळीवर समस्यांचा सामना करावा लागत आहे. डॉमिनोझला मंदीमुळे मोठा तोटाही सहन करावा लागत असल्यामुळेच स्वीडन, स्वित्झर्लंड, आईसलँड आणि नॉर्वे या चार देशांमधून कंपनीने आपला गाशा गुंडाळला आहे. तसेच कंपनी बाजारपेठ नसलेल्या आणखी काही देशांमध्येही आपले आऊटलेस बंद करण्याचा विचार डॉमिनोझकडून सुरु आहे.

रॉयटर्स वृत्तसंस्थेशी संवाद साधताना डॉमिनोझचे सीईओ डेव्हिड वाईल्ड यांनी म्हटले होते की, आम्हाला तोटा होत असून ग्राहकांना आकर्षित करण्यात आम्ही कमी पडलो, आम्ही अशा ठिकाणांहून गाशा गुंडाळणार आहोत. पण तुर्तास भारतामधील जनतेला याची चिंता करण्याची गरज नसल्याचे डेव्हिड वाईल्ड यांनी सांगितले.

Leave a Comment