कुख्यात ड्रग्स तस्करच्या मुलाला सोडवण्यासाठी मॅक्सिकोत गोळीबार

कुख्यात ड्रग्स तस्कर अल चॅपोच्या मुलाला अटक करणे चांगलेच महागात पडले आहे. अल चॅपोच्या मुलाला अटक केल्याने चापोच्या समर्थकांनी पोलिस आणि सैन्यावर हल्ला केला आहे. त्यांनी संपुर्ण शहरात गोळीबार आणि हिंसाचार केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अल चॅपोचा मुलगा ओविडियो गुजमॅनला सोडून दिले आहे.

सुरक्षा दलाने नियमित पेट्रोलिंग करत असताना ओविडियोला अटक केली होती. ओविडियोला पकडल्याची माहिती मिळताच अल चापोच्या समर्थकांनी पोलिसांवर व सैन्यावर हल्ला केला. समर्थकांनी गाड्या, बँरेकेडिंग देखील जाळले.

या घटनेनंतर मॅक्सिकोमधील तनाव वाढला असून, राष्ट्रपती अँड्रेस मॅन्युअल लोपेज यांनी म्हटले आहे की, या घटनेबाबत सुरक्षा कॅबिनेटशी चर्चा करण्यात येईल.

अल चॅपोचे संपुर्ण नाव जोएक्विन अल चॅपो गुजमॅन असे आहे. काही महिन्यांपुर्वीच त्याला जन्मठेप आणि 30 वर्षांची अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याला 12 मुले असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेने अल चॅपोला जगातील सर्वात कुख्यात ड्रग्स तस्कर म्हणून घोषित केले आहे.

 

Leave a Comment