आला हिवाळा तब्येत सांभाळा

winter
भारतातल्या तीन ऋतुंमध्ये पावसाळा हा सर्वाधिक रोगी सिझन मानला जातो आणि हिवाळा हा सर्वाधिक निरोगी ऋतु मानला जातो. एरवी प्रकृतीच्या अनेक तक्रारी असणारे लोकही हिवाळ्यात चांगल्या प्रकृतीचा अनुभव घेत असतात. कारण तो हंगामच चांगला असतो. परंतु पावसाळ्याचा हंगाम संपून हिवाळ्याचा हंगाम सुरू होण्याच्या संधीकाळात प्रकृती काही तक्रारी निर्माण होऊ शकतात. अशावेळी काही पथ्ये पाळली पाहिजेत आणि संधीकाळातील तसेच हिवाळ्यातील तक्रारींना दूर ठेवले पाहिजे. त्यासाठी करावयाच्या उपाययोजना अशा आहेत.

या काळात भरपूर पाणी पिले पाहिजे. मात्र ते पाणी फ्रिजमधले असू नये. या काळात फ्रिजच्या पाण्याला आपल्यापासून दूर ठेवले पाहिजे. अन्यथा सर्दी, नाक वाहणे, घशात खवखव होणे अशा समस्या उद्भवतात. शक्यतो कोमट पाणी प्यावे. खाण्याच्या सवयीमध्ये बदल करून फळे आणि भाजीपाला यांच्यावर भर द्यावा.

शक्यतो गरम कपडे जवळ ठेवावेत आणि शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी त्वचेवर काही क्रिम्स् नियमितपणे लावावेत. डोक्याला कंडीशनर लावल्यानंतर हात स्वच्छ धुवावा. केसांनाही थंडीचा त्रास होत असतो. त्याचा विचार करून दररोज डोक्यावरून आंघोळ करू नये. निदान संध्याकाळची आंघोळ तरी खांद्यावरूनच करावी. रात्री झोपताना पायात पायमोजे आणि हातात हातमोजे अवश्य वापरावेत. शहरातून फिरताना मास्क वापरावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment