‘या’ देशातील खेळाडूंसाठी सुपर गुरू होणार राहुल द्रविड!


बंगळुरू : सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड अध्यक्ष आहे. त्याचबरोबर राहुल द्रविडने याआधी भारतीय अंडर-19 आणि भारतीय अ संघाला प्रशिक्षण दिले आहे. भारताला अनेक युवा खेळाडू द्रविडमुळे मिळाले आहेत. दरम्यान द्रविड आता इतर 16 देशांच्या युवा खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहे.

भारतात बीसीसीआयच्या वतीने इतर 16 देशांच्या युवा खेळाडूंना क्रिकेटचे धडे देण्यात येणार आहेत. गुरू म्हणून यासाठी राहुल द्रविडची निवड करण्यात आली आहे. लंडनमध्ये कॉमनवेल्थ बैठकीत हा निर्णय भारत सरकारने घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 एप्रिल 2018मध्ये भारतात 16 देशांच्या मुला-मुलींना क्रिकेट ट्रेनिंगसाठी आमंत्रित केले होते. मोदींनी लंडन येथे, या मुला-मुलींच्या राहण्याची तसेच, ट्रेनिंग कँपची सुविधा भारत सरकार करणार आहे. त्यामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे राहुल द्रविड या खेळाडूंनी प्रशिक्षण देणार आहे. पुढच्या वर्षी 1 ते 30 ऑक्टोबर दरम्यान हे प्रशिक्षण वर्ग बंगळुरू येथे घेण्यात येणार आहे.

नरेंद्र मोदी, विदेश मंत्रालय आणि क्रिडा मंत्रालयाशी चर्चा करून बीसीसीआयने 16 देशांतील 18 मुले आणि 17 मुलींची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, या 16 देशांमध्ये बोस्तवाना, कॅमरून, केनिया, मोजांबिक्यू, मॉरिशस, नामिबिया, नायझेरिया, रावांडा, युगांडा, जांबिया, मलेशिया, जमॅका, त्रिनिदाद आणि टोबागो, फुजी आणि तन्जानिया अशा देशांचा समावेश आहे.

Leave a Comment