ही आहे ‘टिकटॉकची मधुबाला’, नेटकरी झाले व्हिडीओवर फिदा

टिकटॉक युजर्स प्रियंका कंडवाल एका रात्रीत इंटरनेट स्टार्स झाली आहे. प्रियंका खांडवालचे बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री मधुबाला यांच्या गाण्यावरील लिप सिंगिंग व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. एवढेच काय तर या व्हिडीओमुळे तिला ‘टिकटॉकची मधुबाला’ असे देखील म्हटले जात आहे.

मधुबाला यांच्या अनेक गाण्यांवरील टिकटॉक व्हिडीओ प्रियंकाने शेअर केले आहेत. अनेक युजर्सने तर ती मधुबाला प्रमाणेच दिसते असे देखील म्हटले.

प्रियंका कंडवालने ट्विट करत चाहत्यांचे आभार देखील मानले. तिने लिहिले की, मधुबालाजी यांच्या गाण्यांवरील माझे व्हिडीओ तुम्हाला आवडले त्यामुळे धन्यवाद. त्या खरचं एक जादू आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर तुलना होऊ शकत नाही. हे केवळ मनोरंजनासाठी आहे.

प्रियंका कंडवालचे काही व्हिडीओ –

प्रियंकाने स्टार प्लसवरील कार्यक्रम ‘मरियम खान रिपोर्टिंग लाईव्ह’मध्ये देखील मरियमच्या बहिणीची भूमिका केली आहे. मात्र तिचे मधुबालाच्या गाण्यावरील व्हिडीओ लोकप्रिय होत आहेत.

आपल्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत मधुबाला यांनी 70 पेक्षा अधिक चित्रपटात काम केले आहे. मागील वर्षी द न्युयॉर्क टाईम्सने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने 15 उल्लेखनीय महिलांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये मधुबाला यांचा देखील समावेश होता.

 

Leave a Comment