पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळवणार – नरेंद्र मोदी


हरियाणा – पाकिस्तानला जाणारे पाणी रोखणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी हे आश्वासन हरियाणामधील प्रचारसभेत बोलताना दिले आहे. सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये प्रचारसभा घेण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यस्त आहेत. नरेंद्र मोदी यांनी हरियाणामधील प्रचारसभेत बोलताना पाकिस्तानला जाणारे पाणी रोखून, ते पाणी हरियाणाकडे वळवणार असल्याचे सांगितले.

३७० कलमबद्दल खोट्या अफवा पसरवणाऱ्या काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवण्याचे आवाहनही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ३७० कलम जम्मू काश्मीरमधून हटवण्यात आल्यानंतर काँग्रेसकडून खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना चांगला धडा शिकवा, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

राष्ट्रहितासाठी जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितले. नरेंद्र मोदींनी यावेळी बोलताना आश्वासन देत, आपले सरकार पाकिस्तानला जाणारे पाणी रोखणार आणि तेच पाणी हरियाणाकडे वळवणार. हे आपल्या देशाचे आणि राज्यातील शेतकऱ्याचे हक्काचे पाणी असल्याचे सांगितले.

गेली ७० वर्ष हरियाणामधील शेतकरी आणि आपल्या हक्काचे जे आहे ते पाकिस्तानला मिळत आहे. पण हे पाणी हा मोदी रोखणार आणि तुमच्या घरापर्यंत आणणार. मी आधीच यादृष्टीने काम करण्यास सुरुवात केली आहे. हे पाणी आपला देश आणि हरियाणामधील शेतकऱ्यांच्या हक्काचे असल्यामुळेच मोदी तुमच्यासाठी लढत आहे.

Leave a Comment