हाऊसफुल 4चे मजेदार ‘भूत राजा’ गाणे रिलीज


दिग्दर्शक फरहाद संभाजी यांच्या ‘हाऊसफुल 4’ चे नवे गाणे ‘भूत राजा’ नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अक्षय कुमार यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या उत्कृष्ट ट्रॅकला मीका सिंह आणि फरहाद यांनी आवाज दिला आहे. त्याचबरोबर भूत राजाला संगीत फरहाद आणि संदीप शिरोडकर यांनी दिले आहे. गाण्याचा व्हिडिओ शेअर करताना अक्षयने एक रोचक कॅप्शन दिले. त्याने लिहिले आहे की, भीतीमुळे गप्प बसू नका, फक्त तुम्हाला भेटायला आला आहे.


जादुटोण्यावर आधारित हे गाणे खूपच मजेशीर आहे. ज्यात नवाझुद्दीन उर्फ रामसे बाबांनी वाईट गोष्टींवर विजय मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत तर हे टाळण्याचा प्रयत्न अक्षय कुमार करीत आहे.

पुनर्जन्माच्या कथेवर आधारित या चित्रपटात 1419 आणि 2019 चा काळ दाखवण्यात येणार आहे. ‘हाऊसफुल 4’ मध्ये अक्षय कुमार, कृती सॅनॉन, बॉबी देओल, पूजा हेगडे, रितेश देशमुख, कृती खरबंदा, राणा डग्गुबाती, चंकी पांडे, सौरभ शुक्ला, जॉनी लीव्हर, जेमी लीव्हर सारख्या कलाकारांची भूमिका असेल. हा चित्रपट 25 ऑक्टोबर 2019 रोजी रिलीज होणार आहे.