तुम्ही पाहिला आहे का प्राजक्ता माळीचा बोल्ड अंदाज


सालस, सोज्वळ सून म्हणून झी मराठी वाहिनीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे बरीच चर्चेत आहे. तसेच सोशल मिडियावरही ती सक्रिय असल्यामुळे तिच्या चाहत्यांना रोजच तिच्या बोल्ड, ब्युटीफुल अशा अदांची झलक पाहायला मिळते. लोकांना तिच्या साडीतील फोटो जितके आवडतात तितकेच तिचे बोल्ड आणि हॉट लूक मधील फोटो तिचे चाहते पसंत करतात. आपल्या इंस्टाग्रामवर नुकताच तिने आपला एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. तिच्या चाहत्यांचा हा फोटा पाहून विश्वासच बसत नाही.


या फोटोत तिचे हायलाइट्स केलेले केस आणि तिच्या नोझ रिंगने तिच्या मादक लूकचा अंदाज येईल. तिच्या डोळ्यांमधून तिचा बोल्डनेस चाहत्यांना पाहायला मिळत आहे. हा फोटो पाहून मराठी गर्ल इन बॉलिवूड स्टाईल, पहिल्यांदा मराठी अभिनेत्री एवढी सुंदर दिसत आहे, सुपर सेक्सी, सुपर हॉट अशा अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.


तिचा काळ्या ड्रेसमधील ग्लॅमरस अंदाज या आधीही चर्चेचा विषय झाला होता. पारंपारिक वेशात प्राजक्ता जितकी सुंदर दिसते, त्याचबरोबर तिचा हा ग्लॅमरस अंदाज लक्षवेधी आहे. या फोटोज मधील तिच्या अदा घायाळ करणाऱ्या आहेत.

Leave a Comment