शर्टलेस फोटो शेअर केल्याने ट्रोल झाला हा भारतीय खेळाडू

ऑलराउंडर क्रिकेटपटू विजय शंकरला 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकातून दुखापतीमुळे बाहेर जावे लागले होते. त्यानंतर अद्याप शंकरने संघात पुर्नरागमन केलेले नाही. सध्या विजय शंकर विजय हजारे ट्रॉफीमध्ये शानदार प्रदर्शन करत आहे. विजय शंकरला सध्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे ट्रोल करण्यात येत आहे.

शंकरने सोशल मीडियावर स्वतःचा शर्टलेस फोटो शेअर केला. या फोटोमध्ये त्याचे सिक्स पॅक एब्स दिसत आहेत. शंकरने दोन फोन शेअर केले असून, एक फोटो जूना आहे व दुसऱ्या फोटोमध्ये त्यात झालेले बदल दिसत आहेत.

आपला फोटो शेअर करत शंकरने लिहिले की, घाम, वेळ आणि तपस्या.. याचे फळ नक्की मिळते.

(Source)

शंकरच्या या बदलाने भारताचे अन्य खेळाडू हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यर यांना देखील चांगलेच इंप्रेस केले.

मात्र नेटकऱ्यांनी त्याला या शर्टलेस फोटोवरून ट्रोल करण्यास सुरूवात केली. अनेकांनी त्याला क्रिकेटकडे लक्ष्य देण्यास सांगितले तर काहींनी त्याला सिक्स पॅक्स एब्सपेक्षा क्रिकेटचे आकडे वाढले की नाही हे महत्त्वाचे आहे असे देखील म्हटले.

विजय शंकरने आतापर्यंत भारताकडून 12 एकदिवसीय आणि 9 टी20 सामने खेळले आहेत.

 

Leave a Comment