आयुष्मानचा भाव वधारला!


छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांमध्ये नशीब आजमावल्यानंतर मोठ्या पडद्यावरील अभिनय क्षेत्रातही आयुष्मान खुरानाने विशेष प्रसिद्धी मिळवली. आयुष्मानचा एकंदर वावर, त्याची चित्रपटांची निवड आणि प्रेक्षकांमध्ये असणारी त्याची लोकप्रियता या साऱ्याच्या बळावर चित्रपट वर्तुळात त्याने अतिशय कमी वेळातच आपले वेगळे असे स्थान निर्माण केले.

तर आयुष्मान गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये एक अभिनेता म्हणून विविध रुपांमध्ये प्रेक्षकांसमोर आला. विशेष म्हणजे प्रयोगशीलतेची साथ घेऊन चालणाऱ्या आयुष्मानने आतापर्यंत जितक्या विविध भूमिका साकारल्या त्या प्रत्येतक भूमिकेला प्रेक्षकांचीही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ‘विकी डोनर’, ‘ड्रीम गर्ल’, ‘आर्टीकल १५’, ‘बधाई हो’ अशा अफलातून चित्रपटांच्या बळावर त्याने अंधाधुन चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतही मजल मारली.

आयुष्मान येत्या काळात बाला या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, तत्पूर्वी त्याच्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आयुष्मानने त्याच्या वाट्याला येणारे यश पाहता आता त्याच्या मानधनाचा आकडा पाच पटींनी वाढवला असल्याचे वृत्त ‘बॉलिवूड लाईफ’ने दिले आहे.

आयुष्मान त्याच्या चित्रपटांसाठी आतापर्यंत २ कोटी रुपये एवढे मानधन घेत होता. ज्यामध्ये आता वाढ करत प्रत्येक प्रोजेक्टसाठी यापुढे तो तब्बल १० कोटी रुपये एवढे मानधन घेणार असल्याची चर्चा आहे. याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण, त्याच्या मानधनात सध्याच्या घडीला करण्यात आलेली ही कथिच वाढ अनेकांना धक्का देत आहे.

Leave a Comment