आयसीसी एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या वेळापत्रकात करु शकते मोठा बदल


मुंबई – आता २०२३ पासून क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये मोठा सकारात्मक बदल करण्याचा निर्णय आयसीसी घेण्याची शक्यता असून याच पुढाकारातून मल्टी नॅशनल स्पर्धांच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदलाची याेजना विचाराधीन आहे. यातून आता आयसीसीने २०२३ पासून २०२८ पर्यंत प्रत्येक वर्षी टी-२० चा आणि प्रत्येक तीन वर्षांनी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या आयाेजनाची याेजना तयार केली.

क्रिकेटला याच्या माध्यमातून चालना मिळेल आणि क्रिकेटची लाेकप्रियता जगाच्या कानाकाेपऱ्यात वाढेल, असा विश्वासही आयसीसीने व्यक्त केला. स्वत:ची आणि यजमानांच्या क्रिकेट मंडळांनाही मोठी कमाई याच स्पर्धेच्या माध्यमातून करून देण्याचा प्रस्ताव आहे. आयसीसी यासाठी ग्लाेबल मीडिया राइट्सच्या माध्यमातून आपला महसूल वाढवण्याची शक्यता आहे. आता प्रत्येक दाेन वर्षानंतर टी-२०चा आणि चार वर्षानंतर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यामुळे आता लवकरच या वेळापत्रकामध्ये बदल केला जाणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयसीसीच्या या मल्टिनॅशनल स्पर्धेच्या वेळापत्रकामधील बदलाच्या याेजनेला काहीसा विराेध दर्शवला. आपल्या प्रसारण हक्क कमाईच्या उत्पन्नामध्ये याच्या माध्यमातून घट हाेण्याची भीती बीसीसीआयला वाटत आहे. कारण, प्रत्येक वर्षी आयसीसीच्या प्रीमियम स्पर्धांच्या दरम्यान मोठे ब्राॅडकास्टर्स प्रक्षेपण हक्कासाठी मोठा खर्च करण्यास पसंती दर्शवतील. तसेच हा खर्च द्विपक्षीय मालिकेच्या आयाेजनावरही हाेईलच. बीसीसीआयला आतापर्यंत टीम इंडियाच्या द्विपक्षीय मालिकेच्या माध्यमातून मोठी कमाई करता आली आहे.

Leave a Comment