सन्या मल्होत्राने धरला ‘धक धक गर्ल’च्या गाण्यावर ठेका


आजची पिढीदेखील ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या गाण्याची चाहती आहे. त्याचबरोबर तिच्या नृत्याची मोहिनी बॉलिवूडच्या इतर कलाकारांवरही पाहायला मिळते. माधुरीच्या गाण्यावर आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रानेही डान्स केला आहे. एवढा मजेदार असा तिचा हा डान्स आहे, की हा व्हिडिओ काही तासांमध्येच व्हायरल झाला आहे.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सान्याने डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये माधुरी दीक्षितचे लोकप्रिय गाणे ‘हमको आज कल है इंतजार’ या गाण्यावर ती डान्स करताना दिसते. यामध्ये माधुरीसारखेच हावभाव तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतात. मी गेल्या बऱ्याच दिवसांपासून डान्स केला नव्हता. त्यामुळे डान्स करण्याची मलाही प्रतिक्षा होती, असे कॅप्शन देत हा व्हिडिओ तिने शेअर केला आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावरही प्रचंड लाईक्स मिळत आहेत.

Leave a Comment