पीएमसी बँकेच्या खातेधारकाचा तणावामुळे मृत्यू


मुंबई – पीएमसी बँकत झालेल्या तब्बल अडीच हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आंदोलन सुरू असून मुंबईतील दिवानी न्यायालयाबाहेर पीएमसी बँक खातेदारांनी यासंदर्भात आपले पैसे परत मिळावे म्हणून सोमवारी आंदोलन केले. पण त्यानंतर पीएमसी बँकचा खातेदार असलेल्या संजय गुलाटी यांचा मृत्यू झाला आहे.

जेट एअरवेज मधील नोकरी काही दिवसांपूर्वी गमावल्यानंतर मिळालेला पैसा पीएमसी बँकेमध्ये ठेवी स्वरुपात संजय गुलाटी यांनी ठेवला होता. पण गेल्या काही दिवसांपासून ते बँकच बुडाल्यामुळे तणावाखाली होते. संजय गुलाटी हे सोमवारी दिवाणी न्यायालयाबाहेर आंदोलन केल्यानंतर त्यांच्या घरी आले होते. काही वेळातच संजय यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल केले. पण त्यांचा त्या ठिकाणी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment