असा आहे भाजपचा संकल्पनामा


मुंबई – भारतीय जनता पक्षाकडून मंगळवारी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला असून तुर्तास तरी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर भाष्य करण्याचे ‘दृष्टीपत्र’ या नावाने तयार करण्यात आलेल्या भाजपच्या जाहीरनाम्यात टाळण्यात आले आहे. आगामी निवडणुकांत विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करण्याच्या भूमिकेचा फटका बसू नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा जाहीरनाम्यात नसला तरी, भाजप अजूनही छोटी राज्य करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे यावेळी पक्षाचे नेते माधव भांडारी यांच्याकडून स्पष्ट आले. हा जाहीरनामा भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे, माधव भांडारी आणि केशव उपाध्ये यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला.

वीज पुरवठा, शिक्षण, आर्थिक विकास, सर्वसमावेशी विकास, राज्याचा वारसा, सुरक्षित महाराष्ट्र, आरोग्य, महिला, शेती, जनसामान्यांचे कल्याण, विमान वाहतूक, बंदर विकास-जलवाहतूक, सिंचन-पाणीपुरवठा व ग्राम विकास, रेल्वे विकास, सुराज्य, शेती सुविधा, रस्ते विकास अशा विविध बाबींवर या जाहीरनाम्यातून घोषणांचा वर्षाव करण्यात आल्या आहे.

ही आहेत भाजपच्या जाहीरनाम्यातील आश्वासने:
* लोकसेवा हमी कायदा महाराष्ट्रात आणणार
* एकखिडकी योजना सरकारी कार्यालयांमध्ये लागू करणार
* डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक सत्तेत आल्यास त्वरीत उभारणार
* ५० टक्के अनुदान ठिंबक सिंचन योजनेसाठी देणार
* ऊसतोड कामगार कल्याण योजना राज्यात आणणार
* माहिती आणि तंत्रज्ञान उद्योग विकास प्राधिकरणाची महाराष्ट्रात स्थापना करणार
* माहेरचा आधार ही पेन्शन योजना
* पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणार
* अन्नदाता आधार योजना वयोवृद्ध शेतक-यांसाठी
* मराठी शाळांचे आर्थिक सबलीकरण करणार
* मासिक १५०० रूपये मानधन वृद्ध श्रमिक पत्रकारांना

Leave a Comment