शिकार करण्यासाठी पर्यटकांच्या गाडी मागे धावला सिंह, पुढे काय झाले बघाच

कर्नाटकच्या अटल बिहारी वाजपेयी जूलॉजिकल पार्कमध्ये असे काही घडले की, त्याने सर्वच जण हैराण झाले. सफारी राइड घेत असलेल्या पर्यटकांवर सिंहाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, सिंह पर्यटकांच्या गाडीच्या मागे धावत आहे. कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला व सोशल मीडियावर शेअर केला आहे.

https://www.youtube.com/watch?v=YyhIbHP1RKk#action=share

सफारी करत असलेल्या पर्यटकांची कार सिंहासमोर येऊन थांबते. सिंह कारमधील लोकांकडे बघतो व त्यांच्या गाडीच्या मागे धावत सुटतो. त्यानंतर ड्रायव्हर सिंहपासून सुटका व्हावी यासाठी जोरात गाडी चालवतो. सिंह मागे येत आहे की नाही हे पाहण्यासाठी पुढे जाऊन ड्रायव्हर गाडी थांबवतो. मात्र तरीही सिंह त्यांच्या मागे येत असतो. अखेर ड्रायव्हर गाडी सुसाट वेगात घेतो व सिंहापासून पर्यटकांचे प्राण वाचवतो.

सिंह शिकार करण्यासाठी पर्यटकांच्या मागे लागल्याची पार्कमधील ही पहिलीच घटना आहे.

Leave a Comment