समलैंगिकतेवर आधारित ‘शीर कुर्मा’चे पहिले पोस्टर रिलीज


फराज अरीफ अन्सारी यांचे दिग्दर्शन असलेल्या आणि बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि दिया मिर्झा यांच्या आगामी ‘शीर कुर्मा’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. मारिजके डिसुझा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाची कथा समलैंगिकता या विषयावर आधारित आहे.


समलैंगिकतेवर आधारित बरेच चित्रपट आत्तापर्यंत बॉलिवूडमध्ये तयार झाले. प्रेक्षकांवर या चित्रपटांचाही प्रभाव दिसू लागला असल्यामुळे अशा विषयांवर प्रकाश टाकण्यासाठी नवनव्या चित्रपटांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यापैकीच एक ‘शीर कुर्मा’ हा चित्रपट आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर आणि दिव्या दत्ता या देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तर, सुरेखा शिखरी यांचीही महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराज अन्सारी हे करत आहेत. चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Leave a Comment