ऋतिकसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर अनुष्का शर्मा?


‘झिरो’ चित्रपटानंतर कोणत्याही चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा झळकली नाही. तिने या चित्रपटानंतर मोठा ब्रेक घेतला. पण आता ती लवकरच फराह खानच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. ती हृतिक रोशनसोबत या चित्रपटात पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार असल्याच्या चर्चा सध्या होत आहेत.

इतर माध्यमांच्या वृत्तानुसार २०२१ साली फराह खानचा आगामी चित्रपट रिलीज होणार आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही. पण, या चित्रपटाबद्दलची घोषणा लवकरच केली जाणार आहे. फराह खानसोबत या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीदेखील करणार आहे.

सध्या हृतिक रोशनचा ‘वॉर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत २२५ कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपट समीक्षकांसोबतच प्रेक्षकांनीही या चित्रपटाला चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment