सुरुवाती पासूनच झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले मालिकेचे दुसरे पर्व भन्नाट गाजत आहे. या मालिकेतील शेवंता हे पात्र तर प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरले आहे. शेवंताला आजवर आपण अनेकदा हॉट लूकमध्ये पाहिले आहे. पण सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये तिचा वेगळाच अंदाज समोर आला आहे. या खास फोटोंमध्ये शेवंता चक्क आपल्या हाताने चिकन बनवताना दिसत आहे. नुकतीच दिग्दर्शक संजय जाधव आणि नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव यांनी रात्रीस खेळ चाले 2 च्या सेटला भेट दिली. त्यांच्यासोबत त्यावेळी मजामस्ती करत सेटवरच अचानक चिकन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याच पार्टीसाठी शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर हिने सुद्धा चिकन बनवताना आणि नंतर टीमसोबत त्यावर ताव मारतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
शेवंताच्या चिकनवर मालिकेच्या टीमने मारला ताव
अपूर्वाने शेअर केलेल्या फोटोमध्ये मालिकेतील काही पात्र म्हणजेच शोभा,दत्ता आणि सोबतच प्रमुख पाहुणे संजय जाधव व उमेश जाधव देखील दिसत आहेत. अपूर्वाने आमच्या सेटवर रविवारचे निमित्त साधून अशी चिकन पार्टी झाली असे कॅप्शन या फोटो खाली दिले आहे. आपण मालिका पाहिली असेल तर तुम्हाला यातील बहुतंशी पात्रे कमीअधिक प्रमाणात एकमेकांविरुद्ध कट रचणारी आहेत. पण शेवंता आणि वच्छीचा एकत्र व्हायरल डान्स असो वा आता समोर आलेले हे चिकन पार्टीचे क्षण,यातून खऱ्या आयुष्यात या टीमचे बॉण्डिंग अफलातून असल्याचे दिसून येते.