व्हिडीओ, चक्क स्वतःचे कपडे विकत आहे डिंपल गर्ल


नेहमीच आपली स्टाईल जपताना बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण दिसते. तिच्याकडे एक स्टाईल आयकॉन म्हणूनही पाहिले जाते. ती सोशल मीडियावरही काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. पण ती सध्या तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. ती स्वत:चेच कपडे विकताना या व्हिडीओमध्ये दिसते.


पण असे काय झाले ज्यामुळे तिच्यावर स्वतःचे कपडे विकण्याची वेळ आली. तर आम्ही सांगतो तुम्हाला त्यामागचे कारण… एका वेबसाईटच्या माध्यमातून दीपिका तिचे कपडे विकणार आहे. तिचे हे कपडे तिच्या फॅशनची क्रेझ असणारे विकत घेऊ शकतील. ‘लिव्ह लव्ह लाफ’ या संस्थेसाठी ती काम करत आहे. ती मानसिक आरोग्याशी लढत असलेल्या रुग्णांना या संस्थेच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असते. तिने याविषयीची माहिती काही दिवसांपूर्वीच दिली होती.

हा व्हिडिओ शेअर दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केला आहे. सोशल मीडियावर कपडे विकून येणारे सर्व पैसे ती मानसिक रूग्णांच्या उपचारासाठी खर्च करणार आहे. नेटकरीही तिच्या या उपक्रमाचे कौतुक करत आहेत.

Leave a Comment