पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार बाप-लेक


बॉलीवूड चित्रपटांमध्ये आजवर अनेक बापलेकांच्या आणि मायलेकांच्या जोड्या झळकल्या आहेत. राज कपूर- ऋषी कपूर, अमिताभ बच्चन- अभिषेक बच्चन सारख्या अनेक जोड्या तर हिट सुद्धा झाल्या आहेत. आता यामध्ये आणखी एका जोडीची भर पडली आहे. ही जोडी लाडका विनोदवीर जॉनी लिव्हर आणि त्याची मुलगी जेमी लिव्हर यांची आहे. हे दोघेही पहिल्यांदाच हाऊसफुल 4 या चित्रपटात एकत्र आले आहेत.


सोशल मीडियावर नुकताच या दोघांच्या पात्रांचा पहिला लुक अक्षय कुमारने शेअर केला आहे. अक्षय म्हणतो, भेटा विन्स्टन चर्चगेट आणि ‘गिगली’ला. सन 1419 ची एक आहे तर दुसरा आहे सन 2019 चा. जॉनी लिव्हर चित्रपटात जेमी लिव्हरच्या पुनर्जन्मातील पात्र साकारणार आहे. या आधी किस किसको प्यार करू या चित्रपटाद्वारे जेमी लिव्हरने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. वडिलांप्रमाणेच ती सुद्धा विनोदवीर देखील आहे. तिने या आधी कॉमेडी सर्कसमध्ये भाग घेतला होता. 25 ऑक्टोबरला हाऊसफुल 4 हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment