व्हायरल :अंडी उकडण्याची ही भन्नाट पध्दत तुम्हाला नक्कीच माहित नसेल

सर्वसाधारणपणे अंडी पाण्यात टाकून उकडली जातात. जास्त वेळ जर अंडी उकडली तर फुटून खराब होतात. मात्र आता टिकटॉक युजर्सनी अंडी उकडण्याची एक नवीन पध्दत शोधून काढली आहे. ही अंडी पाण्यात नाही, तर वेगळ्याच पध्तीने उकडण्यात येत आहे. अंडी उकडण्याची ही पध्दत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, अंडी पाण्यात टाकून नाही तर ओल्या मातीच्या गोळ्यामध्ये बंद करून चुलीवर भाजण्यात येत आहेत.

सुरूवातीला ओली माती घेण्यात आली. त्यानंतर त्याचा गोल आकार बनवत त्यात अंडी ठेवण्यात आली. त्यानंतर अंडी उकडण्यासाठी चुलीवर ठेवण्यात येत आहेत. काही वेळानंतर अंडी मातीमधून बाहेर काढण्यात येतात व त्यानंतर उकडलेली अंड्याचे दोन तुकडे करण्यात आले.टिकटॉकवर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

Leave a Comment