नव्या रुपात पुन्हा एकदा येत आहेत आक्कासाहेब


‘रंग माझा वेगळा’ ही नवी मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर 30 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या मालिकेचा विषय सौंदर्याचा अर्थ फक्त गोरा रंग नसून त्याहीपलीकडे मनाचे आंतरिक सौंदर्यही तितकेच महत्त्वाचे असते हे पटवून देणारा असणार आहे.


या नव्या मालिकेतून आक्कासाहेब अर्थात हर्षदा खानविलकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पण यावेळी त्या खूपच वेगळ्या रूपात दिसणार आहेत. प्रेक्षकांमध्ये त्यांची पुढचं पाऊल या मालिकेतील आक्कासाहेब ही भूमिका विशेष गाजली आणि त्या आता सौंदर्या इनामदार या व्यक्तिरेखेसह प्रेक्षकांना दिसणार आहेत.


हर्षदा आपल्या नव्या भूमिकेविषयी सांगतात, मी ३ वर्षांहून अधिक काळ पुढचं पाऊल या मालिकेतून आक्कासाहेब मी भूमिका साकारली. पण आता माझे नव्याने आयुष्य सुरु होत असल्याचे म्हटले तरी चालेल. सौंदर्या इनामदार नावाप्रमाणेच सौंदर्यावर प्रेम करणारी अत्यंत करारी अशी बिझनेस वुमन आहे. तुम्ही सुंदर असाल तर जगावर राज्य करु शकता असा विचार बाळगणारी आणि त्याप्रमाणे वागणारी अशी ही सौंदर्याची भूमिका असेल.

Leave a Comment