एक सिगरेट पडली चक्क 5 कोटींना

फ्रान्सची राजधानी असलेले पॅरिस शहर आपल्या सुंदरतेमुळे आणि पर्यटनामुळे ओळखले जाते. मात्र सध्या पॅरिसमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. फ्रान्समध्ये अशीच एक चोरीची घटना घडली असून, या घटनेने सर्वांनाच हैराण केले.

एक जापानी व्यक्ती पॅरिसमधील 5 स्टार हॉटेलमधून सिगरेट पिण्यासाठी बाहेर पडताच त्याच्या हातातून 8,40,000 डॉलरचे (5,96,44,620 कोटी रूपये) स्विस घड्याळच चोरी गेले. 30 वर्षीय जापानी व्यक्ती रात्री आर्क डी ट्रायम्फ येथील हॉटेलमधून बाहेर पडला. हॉटेलच्या बाहेर येताच एका अनोळखी व्यक्तीने त्याला सिगरेट ऑफर केली. जापानी व्यक्तीने सिगरेट घेण्यासाठी हात पुढे करताच त्याच्या हातावरील स्विस घड्याळ घेऊन चोर फरार झाला. हे घड्याळ रिचर्ड मिले कंपनीचे होते.

पॅरिसच्या एका वृत्तपत्राने एक नकाशा प्रसिध्द केला असून, सर्वाधिक चोरी झालेली ठिकाण दाखवण्यात आली आहेत. काही ठराविक ठिकाणी दोन डझन पेक्षा अधिक महागडी घड्याळं मागील काही दिवसात चोरीला गेली आहेत.

जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान पॅरिस व आजुबाजूच्या परिसरात 71 अशा घटना घडल्या आहेत. या सर्वांची किंमत 109,000 डॉलर एवढी आहे.

मात्र हा जापानी व्यक्ती नशीबवान होता. घड्याळ चोरी करताना त्या चोराचा फोन तेथेच पडला होता. या फोनच्या आधारावर पोलिसांनी तपास करण्यास सुरूवात केली व त्या आधारावर एवढ्या मोठ्या चोरींच्या घटनांचा शोध लागला.

 

Leave a Comment