प्रशासनाने या शहरातील नागरिकांना केले पाच दिवस कपडे न धुण्याचे आवाहन

अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील नागरिकांना 5 दिवस कपडे न धुण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. सर्फ शहरातील पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटने एक आठवड्यांपुर्वी फेसबूक पोस्ट लिहित कपडे धुणे टाळावे असे सांगितले आहे. या मागील कारण देताना विभागाने सांगितले आहे की, समुद्राच्या तटावर असलेल्या या शहरातील पाईपलाईनमधून लोह (Iron) निघून जाईल जावे म्हणून हे करण्यात येत आहे.

The Public Works Department will begin a directional flush of the hydrants and waterlines from October 7th through…

Posted by Town of Surf City on Tuesday, October 1, 2019

फेसबुक पोस्टमध्ये विभागाने लिहिले आहे की, पाण्यामध्ये असलेले अतिरिक्त लोह हे पाईपलाईनमधून निघून जावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना कदाचित दुषित पाणी येऊ शकते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला कोणताही धोका नाही. मात्र या 5 दिवसात नागरिकांनी कपडे धुवणे टाळावे.

पेंडर काउंटी आयलंडमधील नागरिकांना याचा फटका बसू शकतो. मात्र पाण्यामुळे कपड्यांवर काय परिणाम होईल हे विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

मात्र कमेंट्समध्ये नागरिकांनी विभागाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. या गोष्टीची माहिती देण्यासाठी फेसबुकचा वापर का करण्यात आला असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.

पाण्यात लोहचे प्रमाण अधिक असल्यास पाणी गढूळ रंगाचे होते व यामुळे कपड्यांवर डाग पडण्याची शक्यता असते.

 

Leave a Comment