टीक-टॉकवर व्हायरल होत आहेत मधुबाला !


एक चेहरा नव्याने दर दिवशी नव्याने काही गोष्टी समोर आणणाऱ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे. टीक- टॉकच्या माध्यमातून समोर आलेल्या त्या चेहऱ्याला पाहून अनेकांच्या भुवया प्रथमत: उंचावल्या आहेत. अर्थात त्यामागे कारणे देखील तसेच आहे.

अल्पवधीतच टीक-टॉक हे अॅप अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले असून दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता देखील वाढत आहे. विशेष म्हणजे या अॅपच्या लोकप्रियतेच्या मागे काही दर्दी रसिकांची मिळलेली जोड देखील तेवढीच कारणीभूत आहे. अशाच या रसिकांच्या घोळक्याने चक्क मधुबाला यांच्याप्रमाणेच हुबेहुब दिसणाऱ्या एका मुलीला शोधले आहे.

भल्याभल्यांना आरस्पानी सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या, दिवंगत अभिनेत्री मधुबाला यांच्या सौंदर्याची व्याख्या मांडता आली नाही. तसे कोणी धाडसही केले नाही. पण, टीक- टॉक नामक एका अॅपवर प्रियांका कंडवाल या मुलीचे मधुबाला यांच्या गीतावरील व्हिडिओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे.

प्रियांकाला अनेकांनी तर टीक-टॉकची मधुबाला म्हणूनही संबोधण्यास सुरुवात केली आहे. ‘अरे….. ही तर मधुबाला….’, तुम्ही हुबेहूब मधुबाला यांच्यासारख्या दिसता, अशा प्रतिक्रिया अनेकांनीच देत या मुलीकडे लक्ष वेधले आहे. आता तुम्हीच ठरवा ही मुलगी नक्कीच मधुबाला सारखी दिसते का?

Leave a Comment