आयुष्मानच्या ‘बाला’चा ट्रेलर रिलीज


सध्या आपल्या आयुष्याच्या ‘पर्पल पॅच’ मध्ये अभिनेता आयुष्मान खुराणा असून नुकताच त्याच्या आगामी बाला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. त्याची गाडी अंधाधुननंतर जी सुरु झाली, ती आता इतकी सुसाट पळत आहे कि तो केवळ त्याच्या नावावर थिएटरमध्ये त गर्दी खेचत आहे. 7 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

आयुष्मानचा म्हटला की काहीतरी त्यात वेगळेपण असणारच यात काडीमात्र शंका नाही. त्याने सातत्याने वेगवेगळ्या विषयांवरचे, वेगवेगळ्या धाटणीचे, खासकरून समाजात कमी प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या, समाजमनाकडून दुर्लक्षित झालेल्या सजीव घटकांचे आणि काल्पनिक घटनांचे अनेक विषय हाताळले आहेत. तो ट्रेंड त्याने आताही चालू ठेवला आहे. त्याने या चित्रपटात अकाली आलेल्या टकलेपणाचा एखाद्यावर काय परिणाम होऊ शकतो, हे दाखवले आहे. त्यानंतर तो या समस्येवर काय काय उपाय करतो, कुठले मार्ग अवलंबतो, हि या चित्रपटाची उर्वरित कथा आहे.

Leave a Comment