‘या’ सुंदर अभिनेत्रीशी विवाहबद्ध होणार मनीष पांडे!


नवी दिल्ली : आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी भारतीय संघाचा युवा खेळाडू आणि मधल्या फळीचा फलंदाज मनीष पांडे ओळखला जातो. भारतासाठी आगामी टी-20 विश्वचषक खेळण्यास टी-20 स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेला मनीष पांडे उत्सुक आहे. पण मनीष पांडे आपल्या आयुष्यात त्याआधी एक वेगळी इनिंग सुरू करणार आहे.


डिसेंबरमध्ये मनीष पांडे विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून सोबत असलेल्या आपल्या मैत्रिणीसोबत मनीष पांडे विवाहबद्ध होणार आहे. मनीष पांडेची होणारी बायको ही सुंदर अभिनेत्री आहे. एका दक्षिणात्य अभिनेत्रीशी 30 वर्षीय मनीष पांडे विवाहबद्ध होणार आहे. यासंदर्भात काही इंग्रजी वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष पांडेच्या लग्नाची तारीखही ठरलेली आहे. पांडे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लग्नबंधनात अडकू शकतो. सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये कर्नाटक संघाकडून मनीष खेळत आहे. त्याने याआधी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका विरोधात टी-20 सामना खेळला होता.

View this post on Instagram

#ashritashetty

A post shared by Ashrita Shetty (@ashritashettyofficial) on


2 डिसेंबरला आयपीएलमध्ये सगळ्यात आधी शतक करणारा मनीष पांडे विवाहबंधनात अडकणार आहे. दक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टीशी मनीष विवाह करणार आहे. मनीष आणि अश्रिता गेल्या काही वर्षांपासून डेट करत होते. त्यामुळे हे दोघे विवाह आता घरच्यांच्या परवानगीने करणार आहेत. दक्षिणात्य सिनेसृष्टीत 26 वर्षीय अश्रिता शेट्टीचे मोठे नाव आहे. तिनं Indrajith, Oru Kanniyum Moonu Kalavaanikalum आणि Udhayam NH4 अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Leave a Comment