ही कार असेल तर टोलच्या रक्कमेत मिळेल सूट

जर तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सरकार लवकरच इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी खास घोषणा करणार आहे. सरकारच्या योजनेनुसार टोल प्लाझावर इलेक्ट्रिक कार्सना टोलच्या रक्कमेत सुट मिळेल.

50 टक्के सूट –

सरकार यासाठी टोल पॉलिसीमध्ये बदल करणार आहे. परिवहन आणि महामार्ग मंत्रालय नवीन पॉलिसीवर काम करत असून, ज्यांतर्गत इलेक्ट्रिक वाहनांना टोलच्या रक्कमेत 50 टक्के सूट दिली जाईल.

सरकारचा हा प्रस्ताव लोकांना इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देणारा समजला जात आहे. सरकारने इलेक्ट्रिक कारवरील जीएसटी देखील कमी केली आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रस्तावित टोल पॉलिसाचा ड्राफ केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाकडे पाठवला आहे. परिवहन मंत्रालयाने एनएचएआय बरोबर मिळून ड्राफ्ट पॉलिसी तयार केली असून, यामध्ये बोस्टन कंसल्टेंसी ग्रुपची देखील मदत घेण्यात आली आहे.

पाच वर्ष मिळणार सूट –

या नवीन पॉलिसीमुळे एनएचएआयला मोठे नुकसान देखील होऊ शकते. यामुळे लोक इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यास प्रेरित होतील. इलेक्ट्रिक वाहनांवर देण्यात येणारी टोल सूट ही 5 वर्षांची असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment