‘बायपास रोड’मध्ये तेजाबमधील ‘सो गया ये जहाँ’ गाण्याचे रिक्रिएट व्हर्जन


पुन्हा एकदा नव्या रुपात ‘तेजाब’ चित्रपटातील ‘सो गया ये जहाँ’ हे लोकप्रिय गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हे गाणे ‘बायपास रोड’ या आगामी चित्रपटात नव्या स्वरुपात पाहायला मिळणार आहे. नुकतेच हे गाणे रिलीज करण्यात आले आहे.


हे गाणे ‘बायपास रोड’ चित्रपटात नील नितीन मुकेशवर चित्रीत करण्यात आले आहे. झुबिन नौटियाल याने हे नव्या स्वरुपातील गाणे गायले असून तेजाब चित्रपटातील मुळ गाणे नितीन मुकेश यांनी गायले होते.

हे गाणे १९८८ मध्ये खूप गाजले होते. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबध्द केलेले हे मुळ गाणे अलका याज्ञिक, शब्बीर कुमार आणि नितीन मुकेश यांनी गायले होते. नमन नितीन मुकेश यांनी ‘बायपास रोड’ हा आगामी चित्रपट दिग्दर्शित केला असून हा चित्रपट १ नोव्हेंबरला भारतभर रिलीज होणार आहे.

Leave a Comment