व्हायरलः अमृता सिंहवर का आली तोंड लपवायची वेळ ?


आपली अभिनेत्री आई अमृता सिंहसोबत सारा अली एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. सध्या प्रचंड वेगाने यावेळचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ साराने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यात साराची आई अमृता सिंह स्वतःचा चेहरा लपवत हसताना दिसत आहे.


एक लांबलचक डोसा अमृता सिंग यांच्या टेबलवर दिसत आहे. अमृता डोशाचा आकार पाहून हासायला लागल्या. आपल्या मोबाईलवर साराने लगेचच याचे शूटींग सुरू केले. अमृताने ते पाहून स्वतःचा चेहरा लपवला, यावेळी सारा आईला विचारत आहे, की हासायला काय झाले?, चेहरा का लपवत आहेस?

हा व्हिडिओ साराने इन्स्टाग्रामवर शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, मी आणि मम्मी जेव्हा खाण्यासाठी बाहेर गेले तेव्हा डायटची आम्हाला पर्वा नव्हती. अशा प्रकारचे खाणे काही सोपी गोष्ट नाही. फूड कॉपींटिटर्सनाही घाम फुटेल, अशा प्रकारे सारानेच आईची खिल्ली उडवली आहे.

Leave a Comment