तुम्ही पाहिले आहे का ‘हाऊसफुल ४’चे नवे गाणे ?


काहीच दिवसांमध्ये अभिनेता अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल ४’ चित्रपट रिलीज होणार आहे. नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला या चित्रपटाचा ट्रेलरही आला होता. प्रेक्षकांमध्ये विशेष क्रेझ ‘हाऊसफुल’च्या सीरिजची पाहायला मिळते. त्यामुळेच सर्वांना ‘हाऊसफुल ४’ची देखील आतुरता लागली आहे. या चित्रपटातील पहिले गाणे ‘एक चुम्मा’ हे देखील सोशल मीडियावर हिट ठरले आहे. आता या चित्रपटातील दुसरे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.

या गाण्याचे बोल ‘शैतान का साला’ असे असून या गाण्याचे पोस्टर शेअर करुन अक्षय कुमारने गाण्याचा टीजरही शेअर केला होता. अक्षय कुमारची धमाल कॉमेडी या गाण्यात पाहायला मिळते. अक्षयचा १४१९ च्या काळातील ‘राजकुमार बाला’चा लूक या गाण्यात पाहायला मिळतो.

या चित्रपटात अक्षय कुमारचा पुनर्जन्म पाहायला मिळणार आहे. त्याच्याबरोबरच रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती खरबंदा, पुजा हेगडे, क्रिती सेनॉन यांच्याही पुनर्जन्माची धमाल कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद समजी यांनी केले आहे. तर, चित्रपटाची निर्मिती साजिद नादियाडवाला यांनी केली आहे. हा चित्रपट २५ ऑक्टोंबरला रिलीज होणार आहे. राणा दुगबत्ती, चंकी पांडे, सौरभ शुक्ला, जॉनी लिवर, जेमी लिवर आणि इतरही कलाकार यामध्ये झळकणार आहेत.

Leave a Comment