या कुटुंबाने 4 वर्षीय मुस्लिम मुलीला दुर्गामाता बनवत केली पूजा

नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गामातेच्या वेगवेगळ्या स्वरूपांची पूजा केली जाते. देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची रांग लागलेली असते. नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीला पुष्पांजली पूजा, कुमारी पुजा आणि आरतीला विशेष महत्त्व आहे. अष्टमीच्या दिवशी किशोरावस्थेपूर्वीच्या मुलींची दुर्गामातेचे रूप समजून पूजा केली जाते. मात्र पश्चिम बंगालच्या अर्जुनपूर येथील एका बंगाली कुटुंबाने या परंपरेत थोडा बदल करून समाजासमोर एक उदाहरण ठेवले आहे.

अर्जुनपूर येथील दत्त परिवार मागील 6 वर्षांपासून आपल्या घरी दुर्गामातेच्या पुजेचे आयोजन करत आहे. मात्र यावर्षी त्यांनी कुमारी पुजेसाठी एका मुस्लिम मुलीची निवड केली. समाजामधील धार्मिक भेदभाव मिटवण्यासाठी या कुटुंबाने हे पाऊल उचलले.

दत्त कुटुंबातील सदस्य तमल दत्त सांगतात की, आम्ही याआधी देखील गैर-ब्राम्हण मुलींचे कुमारी पूजन केलेले आहे. यावेळी आम्ही मुस्लिम मुलीला देवी म्हणून पुजले. आधी केवळ ब्राम्हण मुलींची पूजा करायचो. मात्र दुर्गामाता पृथ्वीवरील सर्वांचीच आई आहे. त्यामुळे आम्ही परंपरा तोडली.

तमल यांनी सांगितले की, पुजेसाठी मुस्लिम मुलगी सापडणे अवघड होते. त्यावेळी त्यांचे मित्र मोहम्मद इब्राहिम यांनी स्वतःची 4 वर्षांची भाची फातिमाचे नाव सुचवले. मुलगी आपल्या कुटुंबाबरोबर आग्र्याला राहत असे. मात्र इब्राहिम यांनी मुलीचे घरच्यांना यासाठी तयार केले.

Leave a Comment