आता किती पाणी प्यायचे सांगणार तुमची ‘किडनी’

अनेकवेळा दिसते की लोक आपल्या शरीराच्या गरजेनुसार पाणी पीत नाहीत. आजारी पडल्यावर औषधे तर खातात मात्र तेव्हाही पाण्याकडे दुर्लक्ष करतात. अशावेळी औषधांचा परिणाम थेट किडनीवर होतो. आता पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरावर पडणाऱ्या प्रभावांची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिकांनी ‘कॉम्प्युटर किडनी’ तयार केली आहे. हे एक असे मॉडेल आहे जे कमी पाणी पिणाऱ्या लोकांना औषधांच्या प्रभावाबद्दल सांगेल.

शरीरामध्ये पाण्याचे संतुलन राखण्यासाठी किडनी महत्त्वाची असते. याचबरोबर डिहाइड्रेशनमध्ये खूप कमी पाण्याचा वापर करून आपल्या शरीरातील घाण बाहेर काढण्यास मदत करते. ज्या लोकांना किडनीची समस्या आहे, त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण बिघडलेले असते. वैज्ञानिकांनी सांगितले की, अशावेळी योग्य औषधांबरोबरच पाण्याच्या मात्रेचे देखील ध्यान ठेवणे आवश्यक आहे.

कॅनेडाच्या युनिवर्सिटी ऑफ वाटरलूमधील अप्लाइड मॅथेमॅटिक्स फार्मसी अँन्ड बायोलॉजी विभागाच्या प्रोफेसर अनिता लायटन यांनी सांगितले की, ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे. त्यांना पाण्याच्या गोळ्या दिल्या जातात. जेणेकरून ते आपल्या रक्ताच्या घनत्वापेक्षा अधिक युरिन (लघवी) करू शकतील.  यामुळे रक्तदाब कमी करण्यास मदत होते.

लायटन यांनी सांगितले की, रक्तदाबाच्या रूग्णांना अन्य औषधं दिल्याने त्यांच्या हार्मोनल सिस्टमवर परिणाम होतो व याचा किडनीवर देखील परिणाम होऊ शकतो.

या समस्येतून वाचण्यासाठी लायटन यांनी एक नवीन मॉडेल बनवले आहे. जे दाखवते स्नायू आकुंचल्याने युरिन किडनीतून बाहेर मुत्राशयामध्ये येते. तसेच यावेळी हे देखील समोर आले की, रूग्ण पुर्णपणे हायड्रेड होत नाही, तेव्हा तो रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी दोन औषधे घेतो. अशावेळी एस्प्रिन घेतल्यास त्याचा किडनीवर प्रभाव पडतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य नसल्यास त्याचा किडनीवर प्रभाव पडतो. त्यामुळे योग्य मात्रेत पाणी पिणे गरजेचे आहे.

Leave a Comment