तुम्ही बघितलास अण्णा नाईकांचो गरबो…


मुंबई : नवरात्रीचा जोश सध्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. त्यातच गरब्याच्या गाण्यांवर लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच ठेका धरतात. नुकताच विकेंड संपला असून गरब्याचे अनेक ठिकाणी सोसायट्यांमध्ये आयोजन केले होते. ‘वेशभूषा स्पर्धा’ देखील गरब्या दरम्यान आयोजित करण्यात येतात. अशावेळी मालिकांमधील लोकप्रिय भूमिका निवडून त्यांची वेशभूषा करून स्पर्धेत उतरले जाते. सध्या सोशल मीडिया मालिकांमधील एका भूमिकेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अण्णा नाईक झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘रात्रीस खेळ चाले’मधील सर्वांच आवडते पात्र. जरी मोठ्या व्यक्तीचे अण्णा नाईक हे पात्र असले तरीही हे पात्र लहान मुलांमध्ये देखील हे खूप लोकप्रिय आहे. त्यांची चालण्याची पद्धत, बोलण्याची लकब सगळ्यात हटके आहे आणि ती प्रेक्षकांना भावते. तर एका लहान मुलाने हीच स्टाईल पक़ून चक्क वेशभूषा स्पर्धेत ‘अण्णा नाईक’ यांची वेशभूषा करून तेच बेअरिंग पकडून सगळ्यांना आनंद दिला.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. अभिनेता माधव अभ्यंकर हे झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत अण्णा यांचे पात्र रंगवत आहेत. प्रेक्षकांना देखील ‘रात्रीस खेळ चाले पर्व 2’ पसंत पडत आहे. यामध्ये तरूणपणीचे अण्णा दाखवले असल्यामुळे हे बेअरिंग पकडणे या लहान मुलाला सोपे गेले असेल. हा व्हिडिओ कुठचा किंवा त्या मुलाच्या नावाचा अद्याप खुलास झालेला नाही. पण याचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अण्णा नाईक असंय मी… असे म्हणतं हा मुलगा अभिनेता माधव अभ्यंकर यांचा अभिनय.

Leave a Comment