4 किलो सोने आणि 2 कोटींच्या नोटांनी सजवण्यात आली देवीची मुर्ती

संपुर्ण देशात सध्या नवरात्रीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी लोकांची ठिकठिकाणी गर्दी होत आहे. आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम येथील अशीच एक देवी कन्याका परमेश्वरीचे दर्शन घेण्यासाठी लांबून लोक येत आहेत.

या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे 4 किलो सोने आणि 2 कोटी रूपयांच्या नोटांनी ही देवी सजवण्यात आली आहे. दुर्गाष्टमीच्या निमित्ताने 4 किलो सोने आणि 2 कोटी रूपयांच्या नोटांचा वापर करून देवीची मुर्ती आणि मंदिराचे इंटेरियर सजवण्यात आले आहे. सजावट करण्यासाठी विदेशी चलनाचा देखील वापर करण्यात आलेला आहे.

देवीच्या चारही बाजूंना नोटांच्या माळा बनवण्यात आलेल्या आहेत आणि पुढे सोने ठेवण्यात आलेले आहे. 200 भक्तांनी हे सोने व नोटा दान केले असल्याचे मंदिराचे चेअरमन जगन मोहन यांनी सांगितले.

यामध्ये 1 रूपयांपासून ते 2000 रूपयांपर्यंतच्या नोटांचा समावेश आहे. देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी भक्तांची गर्दी होत आहे.

Leave a Comment