या ठिकाणी शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत सर्वात जास्त कोट्याधीश


जगभरात अनेक अशी विद्यापीठ ज्या प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची नुसती चढाओढ सुरु असते. पण आम्ही आज तुम्हाला अशा काही विद्यापीठांबद्दल सांगणार आहोत जिथे शिक्षण घेणारे सर्वाधिक विद्यार्थी हे कोट्याधीश होतात. या 5 विद्यापीठांनी जगातील सर्वात जास्त अल्ट्रा हाय नेटवर्थ असणारे अब्जाधीश दिले आहेत.

अमेरिकेतील नावाजलेल्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा या यादीत पहिल्या स्थानावर समावेश आहे. येथून शिकून निघालेले सर्वाधिक विद्यार्थी हे अब्जाधीश असून 13 हजार 650 एवढी येथील अब्जाधीश असलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे. यांची एकूण संपत्ती 34.9 लाख कोटी रुपये एवढी आहे.

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे सर्वात जास्ट अल्ट्रा हाय नेटवर्थ असणाऱ्या यादीत दुसरे नाव येते. येथे शिकलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 5 हजार 580 विद्यार्थ्यांचे अल्ट्रा हाय नेटवर्थ आहे. यांची संपत्ती 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 51.9 लाख कोटींपेक्षा जास्त या 5 हजार 580 विद्यार्थ्यांचे एकूण उत्पन्न हे आहे.

पेनसिल्वेनिया युनिव्हर्सिटी या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. येथे शिकलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 5 हजार 575 विद्यार्थ्यांचे अल्ट्रा हाय नेटवर्थ आहे. 31.9 लाख कोटी रुपये एवढे या विद्यार्थ्यांचे एकूण उत्पन्न आहे.

कोलंबिया युनिव्हर्सिटी चौथ्या स्थानावर येते. येथे शिकलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 925 विद्यार्थ्यांचे अल्ट्रा हाय नेटवर्थ आहे. 38.2 लाख कोटी रुपये एवढे विद्यार्थ्यांचे एकूण उत्पन्न आहे.

प्रिन्सटन युनिव्हर्सिटी पाचव्या स्थानावर आहे. येथे शिकलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 2 हजार 180 विद्यार्थ्यांचे अल्ट्रा हाय नेटवर्थ आहे. 51.6 लाख कोटी रुपये इतके विद्यार्थ्यांचे एकूण उत्पन्न आहे.

Leave a Comment