या धोकादायक देशात जायची तुमची हिंमतच होणार नाही !


जगभरातील धोकादायक देशांची यादी ग्लोबल पीस इंडेक्स 2019 ने जारी केली असून या देशांतील सुरक्षा आणि स्थिती यांच्यावरून हे देश किती धोकादायक असल्याची जाणीव होत आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच धोकादायक देशांबद्दल सांगणार आहोत जिथे माणसांचा जीव हा बंदुकीपेक्षा अधिक स्वस्त आहे.

या यादीत दहाव्या स्थानावर आश्चर्यकारक रित्या रशिया हा देश आहे. सुरक्षा, अंतर्गत संघर्ष आणि राजकीय दहशतवाद अशा प्रश्नांशी हा देश सध्या लढत आहे.

रिपब्लिक ऑफ कांगो हा देश नवव्या स्थानावर येतो. हा देश लँडमाइन, पूर आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे नेहमीच त्रस्त असतो.

लीबिया या यादीत आठव्या स्थानावर आहे. हा देश सतत वाढणारे अपराध, गृहयुद्ध यामुळे राहण्यास धोक्याचा झाला आहे.

सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक हा देशही सर्वात धोकादायक देशांच्या यादीत सातव्या स्थानावर सामील आहे. राजकीय, गृहयुद्ध आणि आरोग्याशी निगडीत समस्यांमुळे हा देश रहाण्यास धोकादायक आहे.

सोमालिया देशाचे नाव सहाव्या स्थानावर आहे. दहशतवाद आणि सैन्य संघर्षामुळे तिथे राहणे हे अत्यंत धोकादायक आहे.

इराकचे पाचवे स्थान सर्वात धोकादायक देशांच्या यादीमध्ये आहे. दहशतवाद आणि सैन्य संघर्ष हा येथे ऐरणीचा मुद्दा आहे.

यमन या रिपोर्टमध्ये चौथ्या स्थानावर देश येतो. हिंसा, आजार आणि दहशतवादामुळे हा देश त्रस्त आहे.

दक्षिण सुडान हा देश या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. राजकीय आणि जातीय संघर्षामुळे या देशात फार नुकसान झाले आहे. त्याचबरोबर या देशात फार भ्रष्टाचारही आहे.

रिपोर्टनुसार सीरिया देश हा राहण्यास सर्वात धोकादायक आहे. तेथील नागरिकांचे गृहयुद्ध, आयसीस आणि सतत वाढणारे अपराधामुळे हाल होत आहेत.

अफगाणिस्तान या यादीत सर्वात धोकादायक देशांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. तिथे तालिबान आणि इतर दहशतवादी संघटनांमुळे या देशाचे वर्तमान आणि भविष्य कठीण करून ठेवले आहे.

Leave a Comment