विनोद खन्नांना सलमानने वाहिली ‘दबंग ३’च्या टीमसोबत आदरांजली


बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या आगामी आणि बहुचर्चित ‘दबंग ३’चे चित्रीकरण पूर्ण झाले असून सलमान खान पुन्हा एकदा ‘चुलबुल पांडे’च्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानने आत्तापर्यंत बरेचसे या चित्रपटाचे अपडेट्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याने शूटिंग पूर्ण झाल्यानंतरही संपूर्ण टीमसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सुप्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांच्या जयंतीच्या दिवशीच पूर्ण झाल्याने या व्हिडिओतून सलमानने त्यांना आदरांजली वाहिली आहे.


‘दबंग’, ‘दबंग २’ आणि वॉन्टेड यांसारख्या चित्रपटात सलमान खान आणि विनोद खन्ना यांनी भूमिका साकारली होती. विनोद खन्ना हे ‘दबंग’ चित्रपटात सलमानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसले होते. आता ‘दबंग ३’ चित्रपटात विनोद यांचे भाऊ प्रमोद खन्ना हे त्यांच्या जागेवर दिसणार आहेत.

प्रभू देवाने ‘दबंग ३’चे दिग्दर्शन केले असून सलमानसोबतच या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर, अरबाज खान यांचीही मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट २० डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Leave a Comment