आपल्या म्यूझिक लेबलचे पहिले गाणे रणवीरने केले रिलीज


काही महिन्यांपूर्वीच आपले स्वत:चे म्यूझिक लेबल अभिनेता रणवीर सिंहने सुरू केले आहे. त्याच्या म्यूझिक लेबलचे ‘इनक्लिक’ असे नाव आहे. त्याने या म्यूझिक लेबलच्या माध्यमातून आपले पहिले गाणेदेखील रिलीज केले आहे. प्रसिद्ध रॅपर काम भारीने हे गाणे गायले आहे.

या रॅपचे नाव ‘मोहब्बत’ असे आहे. काम भारीने हे रॅप आपल्या अंदाजात गायले आहे. या गाण्याला आत्तापर्यंत २ लाखापेक्षा जास्त व्ह्युव्ज आणि २ हजारापेक्षा जास्त प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. हे गाणे सोशल मीडियावर हिट ठरत आहे. निर्माता नवजार ईरानी यांच्यासोबत रणवीरने मार्च महिन्यात आपले म्यूझिक लेबल लॉन्च केले होते.


रॅपर्सची कला या म्यूझिक लेबलच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर यावी, म्हणून हे लेबल सुरू करण्यात आल्याचे रणवीरने सांगितले होते.

Leave a Comment