पहा सुखोई 30 लढाऊ विमानाची चित्तथरारक प्रात्यक्षिक

उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील भारतीय वायुदलाच्या हिंडन एअरबेसवर सुखोई 30 एसकेआय लढाऊ विमानाने चित्तथरारक प्रात्यक्षिके केली. या प्रात्यक्षिकांना व्हेरटिकल चार्ली असे म्हणतात. या प्रात्यक्षिकांद्वारे एअर चिफ मार्शल आरकेएस भदोरिया यांना अभिवादन करण्यात आले.

हिंडन एअरबेसवर सुखोई 30 एमकेआयने चित्तथरारक अशी प्रात्यक्षिके करत सर्वांचे लक्ष्य खेचले.

8 ऑक्टोंबर रोजी एअर फोर्स आपला 87 वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. या निमित्ताने गाझियाबाद येथील एअर बेसवर लढाऊ विमानांची रंगीत तालिम करण्यात आली. याबाबतचे ट्विट एअरफोर्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आले.

याशिवाय एअरफोर्सने ट्विट केले की, वर्धापनदिनी सिंटलेटिंग एअरोबेटिक डिस्ल्पेमध्ये सुर्यकिरण एअरोबेटिक टिम आणि सारांग हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिके दाखवली जातील.

एअर फोर्सचे सुखोई-३० एमकेआय हे अत्याधुनिक लढाऊ विमान असून, यामध्ये क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता आहे.

Leave a Comment