शाहरूखचा जूना अँकरिंग व्हिडीओ व्हायरल

अभिनेता शाहरूख खान मागील अनेक दिवसांपासून कोणत्या चित्रपटात दिसला नसला तरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. काही दिवसांपुर्वी शाहरूख खान एका खास कारणामुळे ड्रेंड होत होता. शाहरूखच्या वाढदिवसाला एक महिना बाकी आहे, मात्र शाहरूख खानचे चाहते आतापासूनच #1MonthForSRKDay हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. शाहरूखचा एक जूना व्हिडीओ देखील सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरूख अँकरिंग करताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये शाहरूखबरोबर एक महिला अँकर देखील दिसत आहे.  ती म्हणते की, आता कुमार सानू परफॉर्म करणार आहे. यावर शाहरूख विचारतो की, तेच कुमार सानू का जे किशोर कुमार यांच्या अंदाजात गाणे गातात ? शाहरूखचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

शाहरूख खानने आपल्या करिअरची सुरूवात 1989 मध्ये दुरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या फौजी या कार्यक्रमातून केली होती. 1992 मध्ये आलेल्या  दिवाणा या चित्रपटातून शाहरूख खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर शाहरूखने राजू बन गया जेंटलमन, किंग अंकल, बाझीगर आणि डर यासारखे सुपरहीट चित्रपट दिले.

Leave a Comment