वजन कमी करणे तसे अवघड असते

weight
आपल्या देशामध्ये वजन वाढणार्‍यांची संख्या खूप आहे. त्यातल्या बर्‍याच लोकांना आपले वजन वाढत असते याचीच जाणीव नसते आणि झाली तरी ते कमी करावे असे मनापासून वाटत नाही. किंबहुना जाडी वाढणे किंवा वजन वाढणे हे आपल्या आरोग्यापुढचे मोठे आव्हान आहे असे त्यांना वाटतच नाही. उलट काही लोकांना आपले वजन जास्त आहे याचा अभिमान वाटतो. परंतु ज्या लोकांमध्ये ही जाणीव असते आणि ज्यांचा वजन कमी करण्याचा निश्‍चय असतो त्यातल्या फारच कमी लोकांना त्यात यश येते. त्यांना एका गोष्टीची जाणीव होते की, वजन वाढणे जेवढे सोपे आहे तेवढेच ते उतरवणे अवघड आहे.

ते अवघड असल्यामुळेच त्यांना वजन घटविण्याचे प्रयत्न करून सुद्धा त्यात यश येत नाही. कारण त्यांचे ते प्रयत्न योग्य दिशेने आणि पुरेशा अभ्यासाअंती केलेले नसतात. आपल्या वजनाच्या वाढण्यामध्ये आपल्या अन्नाचा ५० टक्के हिस्सा असतो. तेव्हा वजन उतरवण्यात सुद्धा आहारावरच्या नियंत्रणाचा ५० टक्के हिस्सा असतो. तेव्हा आपल्याला वजन उतरवण्यासाठी आहाराचे नियंत्रण आणि नियमन करावे लागते आणि संतुलीत आहार घ्यावा लागतो. अनारोग्यकारक खाणे बंद करावे लागते.

अशा नियमनामध्ये कर्बोदके, प्रथिने आणि फॅटस् यांच्यात योग्य तो समतोल असावा लागतोच. परंतु दर दोन तासांनी थोडे थोडे खाल्ले पाहिजे. अशा पद्धतीमुळे उत्साह टिकतो आणि अन्नातून शरीरात गेलेल्या चरबीचे ज्वलन होते. रात्रीचे जेवण शक्यतो नकोच आणि ते झोपण्याच्या किमान तीन तास आधी केले पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणणे व्यायाम. व्यायाम नियमित पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment