‘रोबोट’ सोफियाने दिलेली उत्तरे ऐकून तुम्हालाही बसेल धक्का


नवी दिल्ली: ह्युमोनॉइड रोबो सोफिया आपल्या शैलीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. तिची शैली पुन्हा एकदा मध्य प्रदेशातील इंदूर येथे झालेल्या परिषदेतही पाहायला मिळते. सोफियाला द फर्स्ट रोबोट सिटीझन देखील म्हटले जाते. या कार्यक्रमादरम्यान जेव्हा एका लेडी अँकरने सोफियाला प्रश्न विचारले तेव्हा तिचे उत्तर ऐकून कॉन्फरन्सममध्ये आलेल्या लोकांना मोठा धक्का बसला. सोफियाची निर्दोष शैली पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सोफिया सामान्य माणसाप्रमाणेच प्रश्नांची उत्तरे देत होती. सोफियाने दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.


विशेष म्हणजे रोबाट सोफियाच्या या शैलीचे अनेक कलाकारही चाहते आहेत. हॉलिवूड स्टार विल स्मिथने यूट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो सोफियाला डेट करताना दिसत होता. सोफिया चेहेऱ्यावर 62 प्रकारच्या भावना व्यक्त करते. पण विल स्मिथसमोर बसताच तीसुद्धा गोंधळून गेली. जेव्हा विल स्मिथने सोफियाला चुंबन घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा सोफियाने सांगितले की आपण माझे मित्र होऊ शकता, त्यानंतर सोफियाने त्याला डोळा मारला.

दरम्यान गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सोफियाने हैदराबादमध्ये माहिती तंत्रज्ञानावरील वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये देखील उपस्थिती लावली होती. तिथे तिला बॉलिवूडशी संबंधित प्रश्न विचारल्यावर सोफियाने तिच्या भावना व्यक्त केल्या. संभाषण दरम्यान रोबो सोफियाला एक प्रश्न विचारण्यात आला की, बॉलिवूडमधील तुझा आवडता अभिनेता कोण आहे? यावर काहीच वेळ न घेता सोफियाने शाहरुख खान असे प्रत्युत्तर दिले. देश आणि जगातील कोट्यावधी लोकांचा आवडता नायक शाहरुख आता सोफिया रोबोचा देखील आवडता नायक बनला आहे.

Leave a Comment