
नवी दिल्ली – पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज ज्याला रावळपिंडी एक्सप्रेस नावाने ओळखले जाते अशा शोएब अख्तरने भारतीय सलामीवीर रोहित शर्माचे तोंडभरून कौतुक केले आहे. रोहितने कसोटीत प्रथमच सलामीला उतरत २२४ चेंडूत १७६ धावांची खेळी केली. शोएब त्याच्या या खेळीवर ‘फिदा’ झाला आहे.
रावळपिंडी एक्सप्रेस रोहित शर्माच्या प्रेमात
२०१३ सालीच रोहित शर्माच्या प्रतिभेची चाहूल शोएब अख्तरला मिळाली होती. त्यामुळे त्याने २०१३ मध्ये रोहितला नाव बदलण्याचा सल्ला दिला होता.
शोएब अख्तरने २०१३ साली बांगलादेशमध्ये रोहित शर्माला, तुझे काय नाव आहे? विचारले होते. रोहितने तेव्हा भाऊ, माझे नाव तुला माहीत आहे, असे सांगून, मी रोहित शर्मा असे उत्तर दिले. शोएबने त्यावर त्याला तुझ्या नावापुढे ‘जी’ हे अक्षर लाव असा सल्ला दिला. ‘जी’ चा अर्थ शोएबने सांगितला. तो म्हणतो, रोहित शर्मा नाही तर ग्रेट रोहित शर्मा. तुझ्यासारखा फलंदाज भारतामध्ये पुन्हा होणार नाही, असेही शोएब त्यावेळी म्हणाला होता. आपल्या युट्यूब चॅनलवर शोएब अख्तरने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात तो रोहितचे तोंडभरून कौतुक करताना दिसत आहे.
